पक्षांची शाळा
पक्षांची शाळा
पक्षांची शाळा भरली एकदा माळावर
एकही जण नव्हता आपल्या ताळ्यावर
सुरू झाला गोंगाट आणि नुसतीच बडबड
मोर गुरुजी धावले करत मोठी गडबड
सगळे पक्षी उभा राहीले स्वतःला सावरत
गुड माॅर्निग गुरूजी म्हणाले सारा पसारा आवरत
मोर गुरुजींनी केला इशारा सार्यांना बसायचा
सुरू झाला तास मोकळ्या रानात नाचायचा
गुरूजी लागले नाचताना पायाने ताल धरू
घुबडाची मान लागली सगळीकडे गोल फिरू
कोकीळेने साथ देत लावला भलताच सूर
पोपट बसल्या बसल्या खावू लागला तूर
ताल धरून सारेच डोलवीत होते माना
मोर गुरुजी होते शेवटी सगळ्यांचे राणा
तास संपला माळावरला फिटले डोळ्यांचे पारणे
नाहीत आता उरली कोणाकडे कसलीही कारणे
