फुलपाखरू
फुलपाखरू


एक फुलपाखरू आलं
हृदयाला छेडून गेलं
काय जादू मंतरली
नाही समजू दिलं
हा पण जादू नक्कीच होती
तिने सारखी सारखी बघायची
सवयच लावली होती
सकाळी सकाळी लवकर उठून
आंघोळ करून
बसायचो येऊन तिला बघायला
कारण ती उठल्या उठल्या दर्शन द्यायची
डोळे चोळत चोळत बाहेर यायची
चोरून चोरून मला पहायची
अचानक मला बघुन दचकायची
आणि हसत हसत घरात पळायची
पारूसं तीला पाहून
खरच खूप भारी वाटायचं
हसायला यायचं
पण हासुन नाही चालायचं
कारण तीला लगेच रडायला यायचं
म्हणून गोड गोड स्माइल देऊन
तीच मन फुलवायचं