फुलांची किमया
फुलांची किमया


प्राजक्ताच्या फुलांचा पडला सडा
वेचायला फुले जीव झाला वेडा
धवल त्याची पाकळी, केसरी दांडी
वेचुन फुले मांडली शंकराची पिंडी
कमळ उमलले सरोवरी
लक्ष्मी स्थापन केली कमळावरी घरोघरी
काट्यातुन जन्मली गुलाबाची कळी
देवपुजेला हजर वेळोवेळी
झेंडूचा तो फुलला बाजार, रुप त्याचे गोड
दारावर तोरण बांधले, देव येण्याची मनी ओढ
चाफ्याचा पसरला सुगंध
वातावरण मंगलमय झाले धुंद
मन गेले मोहरुन, दरवळला सुगंध मनी
काळ्याभोर कुरळ्या केसात बकूळ फुलांची नित्याने माळत रहा वेणी
अंबाड्यावर शोभेल जुई मोगर्याचा गजरा
खिळून रहातील तुझ्यावर नजरा