फुलांची बाग
फुलांची बाग
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
56
फुलते मी कशी
माळी राखतो निगाच तशी
हिरव्यागार झाडांवर खुलते कळी
आता उमलण्याची येते पाळी
लोक येती
अन् मज दुखवती
झाडापासून मज वेगळं करती
माझं अस्तित्व संपवती
सणावाराला माझा मान
ठरवता तुम्हीच स्थान
माझी होते गुंफण गजऱ्यात
नाहीतर वाहिली जातात देव्हाऱ्यात