STORYMIRROR

Prashant Shinde

Others

3  

Prashant Shinde

Others

पहिलं प्रेम

पहिलं प्रेम

1 min
462


आज संक्रात म्हणून

पुढे पाऊल टाकावे म्हंटले

दिवसेन दिवस प्रेम आपले

वाढवावे वाटले


क्षणभर विचार केला

कोपऱ्यावर गाठण्याचा

निर्णय पटकन घेतला

आणि कोपऱ्यावरचा पार गाठला


आडोसा थोडा घेऊन

कानोसा घेतला

तसा होरा तिचा

पाराकडेच वळला


आली आली आली

कुजबुज आमच्यात झाली

आणि माझी तर चांगलीच

तारांबळ उडाली


पुढे झालो धाडसाने

म्हंटले आज आर या पार

माहीत नव्हते मागून येत होता

तिचा बाप डोक्याचा खार


झालो आतल्याआतच ठार

काजवे चमकून दिसला मार

फुकट गेला शौर्याचा वार

गाठला मागे वळून आपला पार


तीळ गुळ घ्या गोड बोला

मित्र झाले लगेच गोळा

झाला प्रेमाचा चोळा मोळा

म्हंटले मित्रांना आता इथून पळा


संक्रात म्हणजे काय हे

मी रे बाबांनो अनुभवले

जेंव्हा पहिल्याच प्रेमाचे असे

तीन तेरा अन बारा वाजले


पतंग प्रेमाचा असा

पाहता पाहता कटला

म्हंटले मनातच बाबांनो

प्रश्न प्रेमाचा क्षणात मिटला....!


Rate this content
Log in