STORYMIRROR

Prashant Shinde

Others

3  

Prashant Shinde

Others

पहिलं प्रेम.!

पहिलं प्रेम.!

1 min
562


पहाटे पहाटे गाडी निघाली

घेऊन साऱ्या बाल मंडळीला

सहलीची ती पहिली वारी

चालली धरण जवळचे पहायला


नट्टा पट्टा नीट नेटका

परिट घडीचे कपडे अंगावरी

थोडी थोडी म्हणत फासली

पावडर लालीसह तोंडावरी


पाठीशी घेतली पिशवी

भरून पुरणारी शिदोरी

जागाही धरली गाडी मध्ये

जाऊन पहिला खिडकी शेजारी


गलका उडाला जागा धरण्या

पिशव्या पटा पटा पडल्या खिडकीतून

एक पिशवी अंगावर आली

झटकन काच बाजूस सारून


सारवा सारव झाली पण

पिशवी तशीच पडली होती

मागे वळऊनी पाहता

एक चिमुरडी रडत येत होती


दोन वेण्या डोकीवरी

ओले अश्रू आजूनही गालावरी

ध्यान परकर पोलक्याचे

येऊन बसले रडतच शेजारी


गाडी चालता गणती झाली

पुस्पि निघाली ती पवारची

अण्णा अण्णा हाक आली

खिडकीतून तिच्या आईची


गाडी निघता माय म्हणाली

सांभाळून घ्या पोरीला

निरोप वाटला मज त्या क्षणी तो

पूजली का देवा हीच पाचवीला....?



Rate this content
Log in