पहिलं प्रेम आई
पहिलं प्रेम आई


आई आ म्हणजे आभाळ आणि ई म्हणजे ईश्र्वर
जिच्या पासुन प्रत्येक नात्याला सुरुवात होते..!!
.
प्रत्येकाचं पाहिलं प्रेम जिथे पहिल्या देवाचे दर्शन होते
कधीच न तुटणारी नाळ आपली तिच्याशी जोडली जाते..!! .
.
माणूस घडतो कोणामुळे तर फक्त तिच्यामुळे कारण तिचं मोठं व्हायचं स्वप्न दाखवते
तळ हाताच्या फोडासारखी ती आपल्याला जपते स्वतः त्रास सहन करते पण आपल्याला खूष ठेवते..!!
.
कित्येक दा तिच्या मनात येत असेल की आपण ही मन मोकळे पणाने हसु
पण आपल्या जन्मानंतर ती स्वतःलाच विसरून जाते..!!
आपली सुखं आपली दुःख ती व्यक्त करायचं विसरून जाते कुठुंबामध्ये
कोणीतरी समजुतीने घ्यावं म्हणुन स्वतः च गप्प राहते..!! .
माझं काय नाही रे ऐवड बाळ तू खूष आहेस ना मग झालं तर माझी काळ
जी नको करुस
असं सांगून आपली काळजी मिटवत असते..!!
.आणि कधी आपण गृहीत धरायला लागलो की आपणच सगळ्यांना सांगते खुप काम असतात ग त्याला
आणि तिला मीच जरा जास्त अपेक्षा ठेवते आणि तेच माझे चुकते..!!
.
स्वतःला इतके विसरते की आपण ही माणूस आहोत आपल्याला ही भावना आहेत
याचा तिच्या नकळत पणे तिलाच विसर पडतो..!!
.कारण आपण तिचं असं आयुष्य बनतं जातो मग आपल्या वेळा नीटनेटकं सांभाळणं
आवडी निवडी जपणं यातच तिचा पुरा वेळ जातो..!!
.
बरं एवढंच नाही तर पै पाहुणे आली गेलेली मंडळी त्यांचं सगळं बघणं त्याच्या
मनातल्या व्यथा जाणून घेणं हे फक्त तिलाच जमतं..!!
.आपण नावाला कधीतरी वाटलं तर तिच्या खुशीत शिरतो तिचे कोडकौतुक करतो
आणि हमखास आपण गृहीत धरतो हेच प्रत्येकाकडून घडत असतं..!!