STORYMIRROR

Prashant Shinde

Others

2  

Prashant Shinde

Others

पहिला पगार,पहिली कमाई..!

पहिला पगार,पहिली कमाई..!

1 min
3.7K


पहिलं बँक खातं ,पहिला पगार

पहिला चेक, पहिलं ATM कार्ड

पहिला खाते नंबर सार सार

नवल वाटण्यासारख...!


पहिल्या पगाराचा चेक

हातात मिळता

आनंद मला खूप झाला

वाटले क्षणभर मला


आत्ता पासूनच

व्यवहार प्रवास सुरु झाला

जपून ठेवला

अप्रूप वाटत होतं


म्हणून मला

केंव्हा एकदा

घर गाठते आणि आईच्या हातात

चेक देते अस झालं मला


घरी न सांगताच

सरप्राईज म्हणून

अचानक अवतरले

आणि

आनंदाचे चेहरे

आईबाबांचे मी

अचंबित होऊन पाहिले


चेक आईच्या हाती

मोठ्या प्रेमाने दिला

आणि आनंदाचा एक सेल्फी काढला

जिंकलं कोण हे

मला कळलं नाही पण

तिला खुश पाहता राहवलं नाही


तिच्या कष्टाची ती

पोचपावती होती

हे जाणवल्या वाचून राहिले नाही

योगा योग असा

साऱ्या अंकांची बेरीज नऊ नऊ

आईची मायाच खरी मऊ मऊ


तिने पण लगेच दिला

गोड गोड खाऊ

मला वाटले आईला इथे ठेवू की तिथे ठेऊ


करती धरती आई माझी

तिनेच सारे कष्ट साहिले

म्हणूनच कष्टाचे फळ

मी आवर्जून तिला दिला


पटते बरे वाटते मनास माझ्या

आईला माझ्या खुश झालेले पाहून

शिकविले जीवन त्यांचे व्यर्थची सारे

जे परावलंबी तगते फुकटचे खाऊन....!



Rate this content
Log in