पहिला पाऊस
पहिला पाऊस
प्रिये काय सांगू पहिल्या पावसाचे
त्याचे वागणे जणू तुझ्या सारखे असायचे
अलगद स्पर्श त्याचा शहारे
तन-मनात वाहे वारे
प्रिय काय सांगू पहिल्या पावसाचे
चेहऱ्यावर पहिल्या थेंब रेंगाळते
तुझ्या चेहऱ्यावर केसाची लटा आठवते
तुझे सौंदर्य तेव्हा मनात साठते
आज पाऊस काहीसा असेच भासते
प्रिय काय सांगू पहिल्या पावसाचे.
तुझ्या संगे मौज पहिल्या सरीची
श्रावणाच्या तुझ्या माझ्या गोष्ट ती प्रेमाची
मातीचा गंध मनात दरवळे
मध्ये येती जोरदार वादळे
प्रिय काय सांगू पहिल्या पावसाचे.
चिंबचिंब ओल्या पावसाची
ती गाणी जणू माझ्या तुझ्या प्रितीची
उधाण वारा करी माझा ग हेवा
माझ्या प्रितीचा तो असे गारवा
प्रिय काय सांगू पहिल्या पावसाचे.
आज तो आहे माझ्या सोबतीला
नाही आज ती माझ्या अवतीभोवतीला
एकटेच माझे असे भिजणे ग सखे
ते पाहून पावसाचे आसू पडे ग सखे
प्रिय काय सांगू पहिल्या पावसाचे.
दुखी माझ्या परी तो आज झाला
उनाड पण कुठे तरी हरवला
चिंब ओल्या पावसाची
ही तिच वेळ होती सखे मिलनाची
प्रिय काय सांगू पहिल्या पावसाचे
