पहिला पाऊस
पहिला पाऊस


लाही लाही झाले उन्हानं
वाट पाहे वसुंधा जलधारांची,
नयन हे प्रतिक्षेत नभांगणी
निल अंबरातूनी बरसण्या पावसाची...१
"पहिला पाऊस" येई कधी रिप रिप
तर कधी होई ढगांचा मोठा गडगडाट,
व कडाडून होई विजांचा चकचकाट
त्यात वाऱ्याची ही लागे शर्यत सुसाट...२
मोठ मोठाले थेंब पावसाचे अंगावरी
अंग अंग रोमांचित होई शहाऱ्याने
मंद,धुंद,सुगंध त्या ओल्या मातीचा
अवनी ही रोमांचित झाली पावसाने......३
काळ,वेळ,वय नाही कसले भान
मनसोक्त सारे नाचू बागडू बेधुंद होऊ,
ह्या "पहिल्या पावसाच्या" सृष्टीत न्हाऊनं
आपण ही लहान होऊनी मजा घेऊ....४
विजांचा लखलखाट,ढगांचा गडगडाट
वादळ वाऱ्याची वाटते भिती मनात,
कधी कोलमंडुनी पडेल झाड वा विज
तरी बेधुंद जलधारा घेतो पावसाच्या आनंदात..५
"पहिला पाऊस" येताच तारांबळ उडे सा-यांची
भिजायचं सोडूनी द्यावे ते छप्पर वा आडोशाला,
खळखळ पाणी वाहू लागले खाच खळग्यातूनी
मुलांच्या कागदी होड्या धावे त्या प्रवाहाला...६
हर्ष "पहिल्या पावसाचा" ज्यांनी अनुभवला
त्यानांच त्या पावसाचा परमानंद लाभला,
"पहिलाच पाऊस" मुंबईत पडला सायंकाळी
आजारी होते तरी त्याचा आनंद उपभोगला...७