पहिला दिवस...!
पहिला दिवस...!
1 min
28K
लख्ख तेज घेऊन
तो सांगितल्या प्रमाणे आला
माझा आळस
झटक्यात निघून गेला
रविवार असूनही
आज संकल्पाचा
पहिला दिवस हा
मोठ्या उत्साहात सुरू झाला
फिरणे झाले ,पळणे झाले
थोडा व्यायाम झाला
रामदेव बाबा अंगी येता
प्राणायामही पार पडला
बरे वाटले सुरुवात
चांगली तरी झाली
अर्धे मैदान मारल्याची
सकाळी सकाळी अनुभूती आली....!
