पहील्या सरी....!!
पहील्या सरी....!!
1 min
27.8K
विजाही चमकल्या नाही
नाही गडगडले आभाळ
फक्त बरसल्या सरी...
त्या तहानलेल्या धरणीवर
ती तृप्त तृप्त झाली नि
हसून गंधाळली वार्यात...
मृद्गगंधाने गायले गाणे
स्वरही भिजले अवनीत...
मग कोकीळ बोलके झाले नि
पहाट अबोल झाली
पहील्या सरीत शहारलेली
एक कवीता ओल्या
खिडकीत ..!!!!
