फेटा...!
फेटा...!
1 min
8.5K
मुंडासे शेला पागोटा
डोईवरचा पटका
यावरती कडी करी
कोल्हापुरी फेटा
शान याची मराठमोळी
साऱ्या विश्वात लै भारी
व्यासपीठावर याची
सदाच असते नित्य हजेरी
लांब सडक शेंडा सोडून
हा मिरवी ऐट डोईवर
घेऊन तुरा मानाचा
मान वाढवी तो धरणीवर
कसब सारे क्षणात ओसंडते
दिमाखात त्या तुऱ्यातून
ऐट ताठर अशी तुऱ्याची
ही सहज घडते कसबी हातातून....!!
