पहाट
पहाट
1 min
16.9K
पुन्हा नव्याने
रवि उगवला प्राचीला
सारुनि काळोखाला
आसमंती
झाली पहाट
पक्षी करिती चिवचिवाट
सारीकडे किलबिलाट
मंजुळ
आवा करिती
सडा सारवण अंगणी
हसते रंगातुनि
रंगावली
गोठ्यात वासरू
चाटते धेनूचा पान्हा
जणू कान्हा
गोकुळी
आरती,भूपाळी
मंदिरी घुमतो घंटानाद
घालिती साद
भक्तजण
