फादर्स डे - 21 जुन
फादर्स डे - 21 जुन
जीवनाच्या रंगमंचावर वडील मुख्य नट
त्यांची कुणाकडुनही कसलीही काहीनाही अट
संघर्षावर करायची मात, वाढवायची शक्ति
मुलांनो त्यांना पहीला गुरू माना, करा त्यांची भक्ति
स्वतः निस्वार्थी, कुटुंबाला देता सर्व सुख
पाठीशी उभे नेहमी हसतमुख
संकटकाळी निधड्या छातीने जातात संकटासमोर
झळ दुःखाची नाही लागू देत कुटुंबावर
न डगमगता दुःख पचवण्याची, अश्रूंना गिळण्याची मोठी ताकद
धीराने सामना करतात नाही वाकत
राहू दे मनगटात बळ, पोलादी छाती
वडीलांची छाया लेकरांना लाभो, करतील दोन हात, संकटाची माती