STORYMIRROR

Ravindra Gaikwad

Inspirational

3  

Ravindra Gaikwad

Inspirational

पेरूया मानवतेचे बीज

पेरूया मानवतेचे बीज

1 min
25


माणसात माणुसकी मुळीच

का दिसेना पहायला आज ?

मानवतेचा जपूया धर्म

पेरुया मानवतेचे बीज...


माणूस माणुसकीला आज

विसरुन हा गेला,

बिघडला जमाना लईच

माणूस हैवान हा झाला,

दिसे इथे प्रत्येकालाच

पैशाचा अती माज..

मानवतेचा जपूया धर्म

पेरुया मानवतेचे बीज...


माणसात माणुसकी असावी

अमानुषपणा नसावा,

स्वर्गा सारखा पवित्र

मानवी समाज दिसावा,

स्वार्थ नको मुळीच कशाचा

सारं सोडा तुझं माझं...

मानवतेचा जपूया धर्म

पेरुया मानवतेचे बीज...


संकरीत औलाद जन्मला येती

आईबापांचे जीव हे घेती,

स्वार्थी नी खोटी सारीच नाती

पशू झाले सारे,पाप झाले अती,

आईबापांना ओळखिना कोणी

म्हणे वाटे त्यांची लाज...

मानवतेचा जपूया धर्म

पेरुया मानवतेचे बीज...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational