STORYMIRROR

Sanket Potphode

Others

4.6  

Sanket Potphode

Others

पौर्णिमेचा चंद्र

पौर्णिमेचा चंद्र

1 min
32.1K


आकाशातला चंद्रही सखे

आज लाजला असेल

पुनवेचा हा चाँद गे

मंद मंद हसला असेल


तुझ्या पुढे त्याचेही

लाजणे फिके पडे

तुला असे हसताना बघता

चंद्र हा कोणा आठवे


तुला पाहुनी सखे

चंद्रही वदला असेल

'पुनवेचा जरी चाँद मी

ही तर पौर्णिमा असे'


चंद्राशी तुझी तुलना

मला अवहेलना वाटे

तुलाच पाहुनी हा चंद्रमा

रात्र ही उजळीत असे


माझ्या अंधाऱ्या रात्रींत

तुझीच सोबत असे

जवळी जरी नसलीस तरी

चंद्रच तुझे प्रतिबिंब भासे!


Rate this content
Log in