पायाखालची माती
पायाखालची माती


नसेल राहात सूर्य
उगवायचा आणि मावळायचा
आमच्या हुकुमावाचून
नसेल थांबत
समुद्राची भरती आणि ओहोटी
आमच्या हुकुमाची वाट पाहात
नसतील विचारीत फुले आम्हाला
फुलण्याआधी आणि कोमेजण्याआधी
नसतील थांबवीत नद्या आपले प्रवाह
आमचा हुकुम होईपर्यंत
काळही अडून बसत नसेल
आमच्या आज्ञेची वाट पाहात
म्हणूनच
जरी नसली जराशीही आशा की,
होईल पहाट आमच्या आज्ञेनंतरच
आणि सागराची भरती, ओहोटी,
फुलांचे फुलणे, कोमेजणेही
आमच्या आज्ञेनुसारच,
किंवा नद्यांचे खंडीत प्रवाहही होतील सुरू
आमच्या हुकुमानंतरच
आणि काळही आपली गती क्षणभर थांबवून
तुकविल मान आमच्यासमोर
तरी खात्री आहे की,
निदान आमच्या पायाखालची माती
ओळखील आमच्या पाऊलखुणा
आणि कुरकुरणार नाही
आमच्या पायांचे ठसे
स्वत:च्या अंगावर उमटवून घेताना
स्वत:च्या अंगावर उमटवून घेताना