पावसातला थंड गारवा
पावसातला थंड गारवा

1 min

50
पावसातला थंड गारवा श्रावणातला
झोंबतो अलवार मनाला अन् तनाला
अंग माझे शहारुनी जाताच अशा वेळी
हमखास आठवते मी मम साजणाला.
श्रावण पाऊस धारा कोसळती झरझर
उपाय त्यावर गरमागरम चहा टपरीवरचा
लज्जत त्या चहाची न्यारी जाणावी
वाफाळलेल्या फक्कड मस्त चहाचा.
ढगांचा गडगडाट विजांचा चकचकाट
पाण्याचे पाट वाहती रस्त्याच्या बाजुनी
सोसाट्याचा वारा वाहतो जोरात अन्
हातातली छत्री ही देतो दूर उडवुनी.
चिंब ओले कपडे पाऊस पाण्याने
दात खिळी वाजे थंड गार थंडीने
अशाच वेळी गरमा गरम चहा फक्त
तो ही टपरीवरचा देतो उष्णता गरमीने.