पावसात भिजताना
पावसात भिजताना


(अष्टाक्षरी)
पावसात भिजताना,
प्रेम पहिलं वाटलं।
देह भिजल्या आधीच,
मन चिंब चिंब झालं॥
पावसात भिजताना,
गंध मातीचा फैलला।
प्रेमासाठी शब्दांचाच,
जणू झराच फुटला॥
पावसात भिजताना,
मन कसं गार होते।
आठवण येते तुझी,
भेटायची इच्छा होते॥
पावसात भिजताना,
आता तुझी साथ हवी।
एकट्याने चाललेल्या,
आयुष्याला जोडी नवी॥
पावसात भिजताना,
डोळे तुलाच शोधती।
पावसाच्या थेंबालाही,
तुझी साथ हवी होती॥