पावसाळा
पावसाळा

1 min

115
पावसाची ओढ,
आता तशी राहीली नाही!
पण पावसाळा येतोच-
जुन्या आठवणी घेवून!
आयुष्यात इतकं पुढं आल्यावरही
पावसाची सुरुवात अशी का व्हावी?
प्रत्येक थेंबात तुझी आठवण यावी.
तुझ्या असण्या- नसण्याने आता
फरक तसा पडत नाही राजा पण
एकमात्र आहे की
तुझ्या आठवणींशिवाय
पावसाळा एकही जात नाही!