पावसा रे पावसा
पावसा रे पावसा
1 min
19.4K
का असा निष्ठूर होसी पावसा रे पावसा
देतसे डोळ्यात पाणी पावसा रे पावसा ।।१।।
घेतला होता वसा तू, 'जीव हे राखीन मी'
का वसा हा सोडशी तू पावसा रे पावसा ।।२।।
का बळीराजास ऐसा त्रास देशी पावसा?
त्रासाला, वैतागला तो पावसा रे पावसा ।।३।।
ठेवला विश्वास त्याने, टाकले भूमीत बी
जातसे वाया तुझ्या रे कारणाने पावसा ।।४।।
लागले डोळे नभाशी मेघ कोठे ना दिसे
जाहले वेडे पिसे ही माणसे रे पावसा ।।५।।
माणसे वैतागली की त्यागती जीवास रे
वेळ न आली तरी ती जातसे रे पावसा ।।६।।
का असा संसार त्यांचा मांडशी उघड्यावरी
थोपवी या आत्महत्या पावसा रे पावसा ।।७।।
