पाऊसश्वास
पाऊसश्वास
1 min
277
रुते अंगात पाऊस, घुसे प्राणात पाऊस
हसे ओठात पाऊस, घुमे श्वासात पाऊस
थेंबाच्या ओठी नव्याने शब्द येती
ओली मिठी अन् ओल्या भावनांचा पाऊस
थरथरे पाकळी फुले पानात मोकळी
मोगर वेलीवरला , अनाम सुगंधी पाऊस
उभ्या पावसात शहारे, अंगी जळती निखारे
चांदण्याच्या देशातला , तू माझा ...फक्त माझाच पाऊस