पाऊसाची कविता
पाऊसाची कविता

1 min

36
मनी आले लिहावी पाऊसावर कविता
जुळून आले शब्द जसे दाटले काळे ढग आभाळाला
पाउसाच्या हळुवार सरी प्रमाणे शब्द आठवत गेले
मध्येच वाऱ्याच्या झुळकेसारखे मनाला भिडले
आणी एकदाच मोठी सर येऊन
कागदावर लेखणीतून बरसले
चिंब भिजला तो कागद शब्दांच्या थेंबांनी
मातीच्या वासाप्रमाणे दरवळला
कवितेचा सुगंध माझ्या मनी
अश्या तऱ्हेने पाऊसावरची कविता पूर्ण झाली