पाऊस
पाऊस
1 min
40.7K
ढगांचा गडगडाट
वीजांचा चमचमाट
पावसाच्या धारा
नाचरे मोरा
फुलवून पिसारा॥१॥
पडला पाऊस
भिजण्याची हौस
मन आलय खुशीत
मी पावसाच्या कुशीत
प्राणी झाले हर्षीत॥२॥
पावसाच्या आगमनानं
धरणी तृप्त न्हाली
भूमी मनोमन आनंदली
माणसं अंतरी सुखावली
छत्री कपाटाबाहेर निघाली॥३॥
शेतकरी अचंबीत झाले
पीक जोमानं वाढले
नमन धरणीमातेला
मनोमनी मोद भरला
पाऊस आला,पाऊस आला....॥४॥
