Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Bhagyashri Chavan Patil

Others

3  

Bhagyashri Chavan Patil

Others

पाऊस माझा सखा झाला..

पाऊस माझा सखा झाला..

1 min
291


सखा बनुनी हळुवार आयुष्यात माझ्या डोकावतो

वारा ही अलगद डोलू लागे त्या समवेत लाटा उसळतो..

बालपणीच्या आठवणीत कागदी होडी बनून वाहतो

उगाच वाटे हातांच्या ओंजळीत नाच तो करत राहतो..


पाऊस आला आणि मला संगे घेऊन गेला..!!


कधी असच वाटतं छोट्या सुखासाठी झगडावे

पाऊस एकटा येतो आता त्याच्या संगे बरसावे..

पाऊस येता स्वतः ही पाऊस होऊन जावे

मन कोरडे असले तरी स्वतः ही पाऊस व्हावे..


पाऊस आला आणि मला संगे घेऊन गेला..!!


आनंदाचे गाणे म्हणत पाऊस हा नेहमीच वेगळा वाटतो

हिरव्या गार पाण्यावरती काही वेगळाच रंग चडतो..

अंगणी चिखल त्यात मातीचा सुगंध दरवळतो

वाफळेला चहा कुरकुरीत कांदा भजीचा सुवास पसरतो..


पाऊस आला आणि मला संगे घेऊन गेला..!!


खिडकी वरून पडणारा एक थेंब ओळखीचा वाटू लागला

नाते कोणते माहित नाही पण मला माझा सखा मिळाला..

कधी पाऊस म्हणता तर त्यात सगळं काही भिजवून गेला

नव्या आलेल्या पालविला नवा कोवळा जन्म देवून गेला..


पाऊस आला आणि मला संगे घेऊन गेला..!!


कोणीतरी पावसाकडे एक टक लावुन पाहते आहे

का कुणास ठाऊक कोणाचा तरी चेहरा मात्र दिसत आहे..

वनश्रीने नटलेला तो परिसर डोळ्यात टिपून ठेवायचा आहे

सारे पाश जुगारुन मला मोकळा श्वास घ्यायचा आहे..


पाऊस आला आणि मला संगे घेऊन गेला..!!


Rate this content
Log in