STORYMIRROR

Arun V Deshpande

Others

4  

Arun V Deshpande

Others

पाऊस आला

पाऊस आला

1 min
27.7K



पाऊस आला पाऊस आला

सर्वांना खरा आनंद झाला

शुष्क परिसर सारा तोही

हिरवागार मस्त हो झाला ….!


पाऊस आला पाऊस आला

उन्हाची काहिली घेउनि गेला

तहानलेल्या जीवांसाठी हा

जीवन जणू घेउनि आला ….!


पाऊस आला पाऊस आला

अंगणात साऱ्या बरसला

पाने- फुले ,अन लता -वेली

चेहेरा बघा कसा खुलला ….!


पाऊस आला पाऊसआला

आला पाउस -दुष्काळ सरला

शेतकरी राजा बघा पुन्हा

आशेने मनोमन फुलला ….!


पाऊस आला पाऊस आला

सर्वांना खरा आनंद झाला …।!


साहित्याला गुण द्या
लॉग इन