पार्थ सापडला....!
पार्थ सापडला....!
पार्थ सापडला
जीव भांड्यात पडला
चमत्कार घडला
मला देव पावला
श्रद्धा अंधश्रद्धा
उगाच द्वंद्व चालू होते
हाती काहीच
जेंव्हा गवसत नव्हते
मिळेल ते धोरण
मिळेल तो मार्ग
भाबडे पणाने
सारे घडत होते
क्षणोक्षणी
प्रत्येक क्षणी
एक पाऊल
पुढे पडत होते
सारे उपाय जोर
हळू हळू धरत होते
पार्थ साठी सारेच प्रयत्न
एक दिलाने होत होते
अंती श्रद्धा म्हणजे
दृढ विश्वास हे परमेश्वरालाही पटले
इच्छा शक्ती जोर धरता
परमेश्वरालाही पाझर फुटले
प्रयत्ने वाळूचे कण रगडिता
तेलही गळे हे अनुभवले
पार्थ बाळाचे एकदा
सर्वांमुळे माय बापास दर्शन घडले
आनंदाचा अपूर्व क्षणसोहळा
आई बापाच्या भेटीने साजरा झाला
आईबापाचा लेक मायेचा साजरा
आपल्या घरट्यात सुखरूप परतूनी आला
आनंद साऱ्यांना मोठ्ठा झाला
दैवाने भाग्याचा क्षण जीवनी दाविला
आईबापाची गाठभेट लेकराशी होता
सुटकेचा श्वास सर्वांनी आनंदे घेतला....!
ज्ञात अज्ञात आशा सर्व मायेच्या प्रयत्नशील
हातांचे आणि सृजनशील सहिष्णूप्रेमळ अंतःकरणांचे
मनःपूर्वक आभार...!
