पारिजात
पारिजात
1 min
11.8K
पहाटेचा मंद वारा
अंगणी उधळी
पारिजातकाचा सडा
मनमोहक त्या दृश्याने
जीव होई वेडा
अंगणी दरवळे गंध फुलांचा
मोहून जाई श्वास माझा
पांढरा केशरी रंग पारिजातकाचा
आनंद मिळे नेत्रसुखाचा
फूल जरी दिसे लहान
तरी औषधी वनस्पतीत त्याला स्थान
पानांची ही वेगळीच कहाणी
आरोग्यासाठी असे त्याची मागणी
