पाणी
पाणी
1 min
27.4K
पाणी पावसाचे
पडे सरसर
दिसे मनोहर
वसुंधरा
पाणी झर्यातलं
वाजवी संगीत
जीवनाचे गीत
ऐकविते
पाणी पाटातलं
वाहे झुळूझुळू
पीक हळूहळू
डोलू लागे
तिच्या केसांतुनी
ओघळते पाणी
होते पाणी पाणी
जीव माझा
देई शिव्याशाप
करी मानहानी
भांडखोर पाणी
नळातील
