STORYMIRROR

MAHENDRA SONEWANE

Others

3  

MAHENDRA SONEWANE

Others

पाणी हे जीवन आहे

पाणी हे जीवन आहे

1 min
11.9K

पाणी हेच जीवन आहे 

त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे 

पाण्यामुळे जीवनात आहे

त्याशिवाय जगण्याची कल्पना व्यर्थ आहे


पाणी देते प्रत्येकास जीवनदान 

प्राण पाण्याचे तू महत्त्व जान

पाणी जतनाचे काम करूया 

त्यास वाचवण्याचा प्रयत्न करूया 


 अनमोल राष्ट्राची संपत्ती पाणी आहे

 निसर्गाचे अनमोल रत्न पाणी आहे 

त्यास वाचविण्याचा प्रयत्न करा 

पाण्याचा काटकसरीने वापर करा 


निसर्गाशिवाय भांडे भरता येणार नाही 

लक्षात ठेवा पाणी तयार करता येत नाही 

पाण्यावाचून कुणी जगू शकत नाही 

सजीव सृष्टीला धोक्यात टाकायचं नाही 


पाणी हे जीवनाचे हे अमृत आहे

त्याचा वापर नीट करायचे आहे

पाणी सर्वस्व या धरतीचे आहे 

जपून वापरा, पाणी हे जीवन आहे 


Rate this content
Log in