पांडुरंग पावला...!
पांडुरंग पावला...!
आरक्षणाची का । उबळ ही आली ।
पोट दुःखी झाली।अचानक ।।
रिकाम तेकडे । रस्त्यावरी आले ।
नाही वापरले । सुबुद्धीस ।।
खुळ्यांची करणी। घेऊन शहाणी ।
तो राजकारणी । करवीतो ।।
पडद्यात राही । हा कृष्णवतारी ।
खेळ रस्त्यावरी। खेळवितो ।।
माऊली माऊली । करी वारकरी ।
मुखी सदा हरी । उच्चारून ।।
त्यासी काय ठावे । असे हे होणार ।
तो नाही येणार । पांडुरंग ।।
अंतर मनात । देवेंद्रची देव ।
आता एकमेव । जनतेस ।।
बिंडोक हे करती । उगा तोडफोड ।
अन मारझोड । फुकाफुकी ।।
तुमचाच तोटा । म्हणे जाणकार ।
योग्य सरकार । असताना ।।
शांत रहा सारे । होईल उद्धार ।
धरा थोडा धीर । प्रेमापोटी ।।
तोची भगवन्त । सर्वची देईल ।
चांगले करील । याचजन्मी ।।
मराठा मराठा । हाची एक नारा ।
गाठेल किनारा । आशीर्वादे ।।
भजा हो विठ्ठल । आलात वारीत ।
शक्ती ही नामात । जाणवेल ।।
तो पाहिलं सारे । मार्ग हा काढून ।
दिले निवडून । त्याचसाठी ।।
पहाल विठ्ठल । खरा पांडुरंग ।
दावी नाना रंग । तुम्हास ही ।।
पावेल श्रीहरी । कराल ही वारी ।
म्हणून श्री हरी । जीवाभावें ।।
कार्तिकी एकादशीच्या सर्वांना शुभेच्छा...!
