पालखी सोहळा
पालखी सोहळा


जगतगुरु श्री संत तुकाराम महाराजांची
पालखी निघाली ठिक 11 वा सकाळी ।
तुळस डोक्यावर आणि पताका खांदयावर घेउनी
अष्टगंध लावले होते भाळी ।
कडक अशा उन्हात वारकरी देत होते
पांडुरगाला नामस्मरणाची हाळी ।
सर्वजण शीस्तीत चालले होते करुन रांग व ओळी ।
अन्नदानाचे खुप मोठया प्रमाणावर वाटप
चालले होते लाडु आणि केळी ।
ज्ञानोबा तुकारामाच्या नाम घोशाने
अवघि दुमदुमली मांदीयाळी ।
ठिकठिकाणी सांउड स्पीेकरच्रूा आवाजाने
वाटत होते अक्षरषः दिन दिन दिवाळी ।
टाळ मुदुंगाच्या तालावर वारकरी नाचत होते
मंत्रमुग्ध होउन खेळी मेळी ।
रस्त्याने चला माउली, माउली चला,
असे वारकरी म्हणंत होते वेळोवेळी ।
आणि टप्पा संपल्यानंतर वारकरी
विश्रांती घेेउ लागले आपल्याला तंबुच्या स्थळी ।