ओढ
ओढ
जीवन जगण्याची माणसाला किती आहे ओढ
जन्मापासून मृत्यूपर्यंत प्रत्येकाची हि दौड
मातेला बाळाची ओढ
पित्याला कुटुंबाची ओढ
भक्तांना देवाची ओढ
अपयशाला यशाची ओढ
इच्छा मनाच्या पुर्ण होता जीवन वाटते गोड
जन्मापासून मृत्यूपर्यंत प्रत्येकाची हि दौड
मनाला भावनेची ओढ
भावनेला शब्दांची ओढ
पुरुषार्थाला पुरुषाची ओढ
हृदयाला स्पंदनाची ओढ
भावपुष्पांनाही मिळते जेव्हा संगीताची जोड
जन्मापासून मृत्यूपर्यंत प्रत्येकाची हि दौड
आत्म्याला देहाची ओढ
फुलाला सुगंधाची ओढ
चातकाला पावसाची ओढ
जिव्हेला वाणीची ओढ
जीवन पुर्ण होता देहालाही मिळे चित्तेची जोड
जन्मापासून मृत्यूपर्यंत प्रत्येकाची हि दौड