STORYMIRROR

Aruna Honagekar

Others

4.0  

Aruna Honagekar

Others

ओढ पावसाची

ओढ पावसाची

1 min
224


पहिली सर पावसाची बरसण्याआघी

दाटले मनी आठवणींचे मळभ

ओघळणारे थेंब पुसून गेले

निराशेचे नभ

अश्या च एका पावसात झाली

होती भेट आपली

ओंजळ प्रेमाची वाहून गेली

तरी वाट कशी सुकली

एका छ़त्रीतला स्पर्श ओला

मन पटलावर उमटला

प्रीतीच्या स्पर्शाने रोमरोम शहराला

विरहाचे वादळ काही केल्या ़शमेना

आठवणींच्या पावसात मन काही रमेना

अस्वस्थ रात्र जाते उलटून

दुरूनी येते नवी पहाट उमलून

पावसाची सर नुकतीच बरसली

आठवणींची पाऊलवाट पुन्हा हिरवळली 

पाऊलवाटेवरी डोळे आता फक्त

तुझ्या आगमनासाठी

भरून भरून येते

ओढ पावसाची


Rate this content
Log in