ओढ पावसाची
ओढ पावसाची

1 min

43
ओढ अशी पावसाची
जशी सुरेल तान कोकीळेची
गाईन गीत ती प्रेमाने
येईल पाऊस आनंदाने
ओढ अशी पावसाची
जशी कळीला घाई उमलण्याची
कळी उमलून येईल
पाऊस पाणी घेऊन येईल
ओढ अशी पावसाची
जशी हिरवी पाने वृक्षाची
वृक्ष बहरुन येईल भरभर
पाऊसधारा पडतील सरसर
ओढ अशी पावसाची
जशी अबोल प्रीत शब्दाची
शब्द खेळती तालाने
पाऊस बरसेल नेमाने
अशी ओढ पाऊसाची
जशी अतृप्त चातक
वाट पाही मेघांची
मेघ बरसती आनंदाने
चातक तृप्त होई प्रेमाने
ओढ अशी पावसाची
जणू नाजुक नक्षी अंबराची
अंबर सजून येईल
पाऊस घेऊन येईल