Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Manisha Patwardhan

Others

4  

Manisha Patwardhan

Others

ओढ पावसाची

ओढ पावसाची

1 min
27


चातकास लागे

ओढ पावसाची

नजर तयाची

नभाकडे..


मेघ गडगडे

वीज सरसरे

प्रकाश पसरे

धरेवरी..


पर्जन्य वृष्टीही

रिमझिम झाली

किमया घडली

आसमंती..


मोतियांच्या माळा

कोणी त्या ओविल्या

क्षणी ओघळल्या

धरेवरी..


टपटप थेंब

धरेवरी पडे

अकल्पीत घडे

अंकुरात..


हिरवा हिरवा

परिसर झाला

आनंद मनाला

बिलगला..


पर्जन्य सोहळा

आरंभ जाहला

आनंदीत झाला 

शेतकरी..


Rate this content
Log in