ओढ पावसाची...
ओढ पावसाची...

1 min

62
ओढ पावसाची मनी
ओलावला हा वारा
वाटे नभ उतरूनी
देई अंगी तो शहारा
दाटून हे ढग आले
दारावरी तो किनारा
कसे मावतील हे सारे
कसा मांडू हा पसारा?
बोचरा हाच गारवा
तोही शोधितो आसरा
मग नकळत सर्व सारे
फुलवी मोहुनी पिसारा
प्रश्न सुटले कधीचे
जसे तोडून पहारा
बहरली ही वनराई
कसा गंधित नजारा
अशी पावसाची ओढ
चहू दिशी तो भरारा
येता मनाला पालवी
देई रंग तो गहिरा