STORYMIRROR

Bharati Sawant

Others

3  

Bharati Sawant

Others

ओढ पावसाची

ओढ पावसाची

1 min
28

गाणी खुशीची गाऊनी

 पाखरे भरारली गगनी

 उबारा मिळता जलाने

 येतील फिरुनी अंगणी 


ओढ पावसाची वाटे

 सांडल्या धारा अंगणात

चला वेचुया पागोळ्या

तारका या नभांगणात 

शीळ घालुनी कानात

गेला हळूच रानवारा

मेघांनी सांडल्या इथे

धवलश्वेत हिमगारा

धुक्याचे लेऊनी अभ्र

 उगवला भास्कर नभी

 प्रसन्न सोवळीच उषा 

स्वागताला राही उभी


साहित्याला गुण द्या
लॉग इन