ओढ पावसाची त्याले ...
ओढ पावसाची त्याले ...
ओढ पावसाची त्याले , बाप सपान पेरतो
नभ गगनी दाटता हाती तिफन धरतो ..
ओढ पावसाची त्याले बाप सपान पेरतो ..
साथ पावसाची बा ले , कधी साथ ही सोडतो ..
ओढ पावसाची त्याले बाप सपान पेरतो ..
येता पहीला पाऊस मृगकिडाही पुजतो ..
ओढ पावसाची त्याले बाप सपान पेरतो ..
धरतीमायेची तो खणानारळे ओटीही भरतो .
ओढ पावसाची त्याले बाप सपान पेरतो ..
हा जगाचा पोशिंदा कधी उपाशी झोपतो ..
ओढ पावसाची त्याले बाप सपान पेरतो ..
थेंब येता धरणीवरी बाप आनंदे न्हाहतो ..
ओढ पावसाची त्याले बाप सपान पेरतो ..
अवघ्या वेदनेचा समुद्र कसा त्यालाच घेरतो ..
ओढ पावसाची त्याले, बाप सपान पेरतो ..
डोही दुःखाचे डोंगर , तरी सुखात हसतो ..
ओढ पावसाची त्याले बाप सपान पेरतो ..
तो कष्टच करतो , तो क्षणाक्षणाला मरतो ...
ओढ पावसाची त्याले बाप सपान पेरतो ..
भोळाभाबडा स्वभाव , प्रेमसागर भासतो ...
ओढ पावसाची त्याले बाप सपान पेरतो ..
धामाने माखतो , मला विठोबाच दिसतो ...
<p>ओढ पावसाची त्याले बाप सपान पेरतो ..
त्याच्या नशिबाचा खेळ कोणता देव हा लिहीतो ?
ओढ पावसाची त्याले बाप सपान पेरतो ..
आम्हा लेकराच्यांच भविष्य तो मातीत शोधतो ..
ओढ पावसाची त्याले बाप सपान पेरतो ..
बाप एकटाच राबतो , तो एकटाच लढतो..
ओढ पावसाची त्याले बाप सपान पेरतो ..
बाप मायाळू आहे माझा, मले उराशी धरतो ..
ओढ पावसाची त्याले बाप सपान पेरतो ..
असा बाप हा गरीब पण मले भरून उरतो
ओढ पावसाची त्याले बाप सपान पेरतो ..
एका एका पैशासाठी जीवाच रान तो करतो
ओढ पावसाची त्याले बाप सपान पेरतो ..
सुखात साथी सगळे , दुःखात एकटा पडतो
ओढ पावसाची त्याले बाप सपान पेरतो ..
काळ्या आईची करणी , तीला माय तो म्हणतो
ओढ पावसाची त्याले बाप सपान पेरतो ..
घर झोपले असता , रातरात तो जागतो ..
ओढ पावसाची त्याले बाप सपान पेरतो ..
काळ्या आईच्या कुशीत तिफन चालतो ,
माझा शेतकरी बाप अश्रू मोतीही पेरतो .
....ओढ पावसाची त्याले बाप सपान पेरतो ..