STORYMIRROR

Shila Ambhure

Others

3  

Shila Ambhure

Others

नववधू

नववधू

1 min
262

वधु उभी

सजलेली

सालंकृत

नटलेली


नाकामध्ये

नथ डुले

भाळावरी

कुंकू फुले


बिंदी करी

चमचम

पैजणांची

छमछम


किनकिन

बिल्वरांची

झिलमिल

झुंबरांची


सौभाग्याचा

अलंकार

डोरलेही

ऐटदार


असे रूप

साजिरीचे

बघा सारे

गोजिरीचे


Rate this content
Log in