STORYMIRROR

kishor chalakh

Others

3  

kishor chalakh

Others

नवं वर्ष नवा संकल्प

नवं वर्ष नवा संकल्प

1 min
528


जुनं विसरून जाऊया

धरुया ध्यास नव्याचा

घट्ट करुनी आपली नाती

उधळुया रंग प्रेमाचा


नवे वर्ष नवा संकल्प

आजच ठरवून घेऊया

नको आता उद्याची बात

सुरुवात चला करूया


जाती येती दुःखाचे प्रसंग

विसरून चालत जायचं

आलं संकट कितीही

मार्ग नाही सोडायचं


दुष्ट वृत्तीला बाजूला सारून

सत्कार्याचा अवलंब करूया

मानून सकलास आपले बंधू

चला बंधुभाव जोडुया


ध्यास धरा संकल्पाचा

पूर्ण करूनचं दाखवूया

गेले ते विसरुनी सारे

नव्याने सुरुवात करूया



Rate this content
Log in