STORYMIRROR

गोविंद ठोंबरे

Others

4  

गोविंद ठोंबरे

Others

नवचेतना

नवचेतना

1 min
28.3K


अरे पेटवा पेटवा

क्रांती सूर्याच्या मशाली

ढोल वाजवा वाजवा

नाद घुमु द्या आभाळी


अरे पाजवा पाजवा

ज्ञान सागर मुखांनी

मग उठू द्या उठू द्या

विजयी गुलाल मस्तकी


अरे फुटू द्या फुटू द्या

कोंब अंकुर मनोमनी

सारे उठू द्या उठू द्या

नव चैतन्य नभांगनी


गीत गाऊ द्या गाऊ द्या

शौर्य महतीचे जनी

पाणी फेसाळ होऊ द्या

सुपीक विचारांचे धनी


पिलं पाखरे होऊ द्या

झेप क्षितीजाच्या तनावरी

सारे मंथन होऊ द्या

बाळ चिमण्या मस्तकावरी


Rate this content
Log in