STORYMIRROR

Smita Murali

Others

4  

Smita Murali

Others

नव वर्ष

नव वर्ष

1 min
878


*नव वर्ष आलं*

झुंजूमुंजू झालं बघा
नवं वर्ष आलं आलं
सडा आणि रांगोळीनं
स्वागतही मस्त झालं

नवा संकल्प धरला मनी
पहाटे लवकर उठायचं
व्यायाम आणि योगासोबत
रोज अभ्यासही करायच

चैतन्याचा सुटला वारा
जोश अंगात भरला
नव्या नव्या संकल्पाचा
शुभारंभ आज झाला

दिल्या सगळ्यांनी शुभेच्छा
सुख समृद्धीचे जावो वर्ष
गोडधोड खायला मिळता
माझ्या मनास झाला हर्ष

शाळा होती सजवलेली
तिथे होता आनंद मेळा
नविन वर्षाच्या स्वागताला
सारी मुले झाली गोळा

भेटकार्ड शुभेच्छांनी झाला
असा पहिला दिवस साजरा
नविन वर्षातल्या प्रत्येकदिनी
राहो असाच हा चेहरा हसरा!

स्मिता मुराळी, सोलापूर


Rate this content
Log in