नसे भान मला काही
नसे भान मला काही
सुगंध पसरला चहूकडे फुलांचा
चाहूल लागली मला तुझ्या येण्याची
माझ्यातील हरवलेले स्वप्न
शोधण्यास निघाली मी
मंद वाऱ्याची झुळूक पसरे
जाणीव होते मला, तुझ्या येण्याची
गंधित झाली मी वाऱ्यापरी
भान नसे मला काही विसरुनी गेलो मी
अशी कशी वेडी साद ही
मोहून टाकले तू वेडे मला
अशीच साद दे तुझ्या येण्याची
परतुनी तू ये मला मिठीत घे
गंधीत झाली मी तुझ्या येण्याने
आले अश्रू नयनी माझ्या
हळूच तू टीपावे ओठांनी तुझ्या
ते बघुनी भराऊनी जाईल मी वेडापिसा
कधी ना संपी हा दिवस
कधी ना संपे रात ही
दिवसरात्र फक्त तुझाच मी
असे शब्द तू दे मला
