नोसर्विस...मेमरी फुल्ल...!
नोसर्विस...मेमरी फुल्ल...!
मेमरी मोबाईलची एक वेगळंच कोड
आधी मधी फुल्ल होता अडत घोड
होते मनातच मार झोड
जणू काखेतील ठसठशीत फोड
इतकी वर्षे झाली कधी
मेमरी कोणाला आठवली नाही
म्हणून शाळाच आमच्या पिढीची
कधी मेमरीत भरली नाही
आता नवं फॅड अंगी भिनलय
मेमरीच दर्शन डबीत घडलय
एक पाऊल प्रगतीच पुढं पडलय
सार कसं मेमरीत गुपचूप दडलंय
भरा भरा मेसेज येता
चित्र सुद्धा जागा अडवतात
आणि पहाता पहाता
मोबाईल हँग करून बंद पाडतात
ओव्हर लोड झाली की
किर मेमरीही करते
वेळ काढून डिलीट बटन
दाबत बसायला लावते
तेंव्हा मात्र कधी नव्हे ते
वर्तमानातच सोय ती दिसते
अपडेट राहण्यातच खरे
मेमरीचे मोल सहज कळते
आता सारे सुरळीत चालते
डिलिटचे बटन आपले काम करते
मेमरी फुल्ल चे भय निघून जाते
मोबाईलचे पण मग कौतुक वाटते....!!
