STORYMIRROR

Prashant Shinde

Others

4  

Prashant Shinde

Others

नंदी बैल..!

नंदी बैल..!

1 min
7.5K


नंदी बैल...!!!

लहान पणीची आठवण

आज अंतरात डोकावली

नंदी बैलाची स्वारी

माझ्या दरी आली

गुबु गुबु गुबु गुबु


वाद्य वाजे तालात

नंदी बैल नाचे

दारी माझ्या त्याच्याच नादात

धष्टपुष्ट अभा त्याची

भुरळ घाली डोळ्यास

ऐट त्याची जगावेगळी


मिरवी साऱ्या तो गावात

घराघरातून वास त्याचा

माहेरचा तो दूत जसा

माय माऊली गृहलक्ष्मी


धान्य देई आनंदे फसा फासा

मान डोळवुनी हुंकारी मायेने तो

खाऊन गरीबा घरची मीठ भाकरी

इमाने इतबारे निभवीत असतो

सदैव धन्याची रोजी रोटीची चाकरी


वाचा धन्याची सत्य ठरावीतो

आशीर्वाद देऊनी सर्वांना

गल्लो गल्ली ख्याती त्याची

त्याला न लगे कधी परवाना


विश्वासाची खूण गाठ बांधतो

बांधून ठेवण्या बारापगड जातींना

हिंधु धर्माची धुरा वाहतो

गल्ली बोळातून मिरवत फिरताना....!


ഈ കണ്ടെൻറ്റിനെ റേറ്റ് ചെയ്യുക
ലോഗിൻ

More marathi poem from Prashant Shinde