नजरेत पहाता क्षणभर...
नजरेत पहाता क्षणभर...


नजरेत पहाता क्षणभर
काळीज कसं थांबलं होतं.
स्वासही मंदावला होता
जेंव्हा नजरेने नजरेत पहिलं होतं.
तुझ्या मनातलं हितगुज
माझ्या मनाने ऐकलं होतं.
किती प्रेम करतेस
तेंव्हाच मला कळलं होतं.
हात थरथरते,
मन थोडंस बिथरलेलं
उमटलेल्या अश्रूंना
पापणीच्या काठावर अडवलेलं.
पुन्हा जेंव्हा भेटशील
अश्रूंचीही वाट मोकळी होईल
लवकर भेटशील ना ग सखे..?
कारण जीव लावलेल्या आठवणीने
आता मात्र जीव जाईल.