नजर
नजर
माझी नजर चांगली की वाईट
हे मला आज ठरवायच आहे
माझ्या नजरेच परीक्षण
आज मला करायचं आहे
त्यासाठी मला घरातून
बाहेर पडायचं आहे
बाहेरच जग पुन्हा एकदा
नजरे खालून घालायचं आहे
नजरेत मला चांगलं चांगलं
सार भरायचं आहे
भरलेल पुन्हा पुन्हा
तपासून पहायचं आहे
संकल्प सोडलाय मी
आज जमा पुंजी करण्याचा
जमेतून वाईट सार
डोळ्यातून काढून टाकण्याचा
भरल्या डोळ्यांनी खरेच
घरी परतल्यावर शांत शांत वाटलं
पहाता बाहेरची दुनिया
डोळ्यांचं पारणं फिटलं
चांगल्या वाईटासाठी चाळणं
रात्री झोपताना लावली
डोळे माझे पूर्ण रिते झाले
चांगले सारे गळून पडले
म्हंटल उद्यासाठी खाली डोळे
पुन्हा ताजे तवाने झाले
तेंव्हा मला पटले या सुंदर दुनियेत
वाईट असे काहीच नाही राहिले....!
