STORYMIRROR

गोविंद ठोंबरे

Others

3  

गोविंद ठोंबरे

Others

निवृत्ती

निवृत्ती

1 min
14.4K


खूप काही केलं आजवर

कामाच्या धुंदीत वाहत गेलं

नोकरीच्या पैल तीरावर

बरंच काही वल्हवत राहिलं


मेहनतीच्या घामानं आजवर

कष्टाचं सुख सोयरिक केलं

आयुष्याच्या चाल पटावर

स्वप्नागत अवचित प्रेम झालं


उसंत नाही घेतली एवढी

अविरत कष्टाचं पाणी वाहिलं

हसत खेळत का होईना

संकटाचं निर्मूलन अवघ्या केलं


आज ती वेळही जातेय

मागे वळून कधी न पाहिलं

निवृत्तीच्या आराम कवचात

माझं अस्तित्व कामी लावलं


माझे मी अनुभव सारे

शिंपल्यात ठेवून मोती केलं

घरट्यात आता परत चाललो

मनोगत माझं वेचून मांडलं


Rate this content
Log in